महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्स समोर आज सनरायझर्स हैदराबादचे आव्हान; कोलकाता विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक - कोलकाता नाईट रायडर्स

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर या स्पर्धेच्या 25व्या सामन्यात शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स ( KKR vs SRH ) हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सलग दोन विजयांची नोंद करणारा हैदराबाद संघ उत्साहात मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी, कोलकाताला शेवटच्या सामन्यात दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर विजयी मार्गावर परतण्यासाठी सज्ज आहे.

KKR vs SRH
KKR vs SRH

By

Published : Apr 15, 2022, 4:24 PM IST

मुंबई:शुक्रवारी (15 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2022 चा 25वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad ) संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातवाजता सुरुवात होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघाने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात तिसरा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.

आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders Team ) संघाचे पाच सामने झाले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात संघाने विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघाने ( Sunrisers Hyderabad Team ) आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय आणि दोनमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळए हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे.

SRH विरुद्ध KKR मधील हेड डू हेड आकडेवारी आणि रेकॉर्ड -

1. हेड डू हेड मॅचमध्ये, केकेआरचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वरचष्मा आहे. केकेआरने 14 सामने जिंकले आहेत तर सनरायझर्स हैदराबादने 7 सामने जिंकले आहेत.

2. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने 397 धावा केल्या आहेत. याशिवाय केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही हैदराबादविरुद्ध ३७८ धावा केल्या आहेत.

3. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने केकेआरविरुद्ध 223 धावा केल्या आहेत.

4. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध केकेआरच्या सध्याच्या गोलंदाजांमध्ये उमेश यादवने 12 विकेट घेतल्या आहेत.

5. भुवनेश्वर कुमार केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

सनरायझर्स हैदराबाद :केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, आर समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमेरो शेफर्ड, मार्को जेन्सन, जे सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, शॉन अॅबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारुकी, उमरान मलिक आणि टी नटराजन.

कोलकाता नाईट रायडर्स :आरोन फिंच, अभिजित तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टिम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज आणि शेल्डन जॅक्सन.

हेही वाचा -RR vs GT IPL 2022 : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ३७ धावांनी दणदणीत विजय

ABOUT THE AUTHOR

...view details