मुंबई:इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) मधील 25 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) आणि कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders ) यांच्यात खेळला जात आहे. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार कोलकाताने 20 षटकांत 8 विकेट गमावत 175 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबादला विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य दिले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्या षटकातच संघाला पहिला धक्का बसला. मार्को यान्सेनने अॅरॉन फिंचला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नटराजनने 5व्या षटकात व्यंकटेश अय्यरला बाद करून संघाला दुसरा धक्का दिला. त्याच षटकात त्याने सुनील नरेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दहाव्या षटकात उमरान मलिकने श्रेयस अय्यरला चौथा झटका दिला. कोलकाताकडून नितीश राणाने (54) अर्धशतक झळकावले. आंद्रे रसेलने 49 धावा केल्या.