मुंबई:सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स ( Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans ) संघात आज आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एकविसावा सामना खेळला जाणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. दोन्ही संघानी आपापला मागील सामना जिकंला आहे. त्यामुळे हा सामना देखील जिंकण्याचा दोन्ही संघाचा इरादा असणार आहे.
आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरातच्या संघाने दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या ( Captain Hardik Pandya ) संघाने आतापर्यंत सलग तीन सामने जिंकले आहेत. तर हैदराबादची सुरुवात खराब राहिली आणि सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु त्यांनी सीएसकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्सने पहिला विजय नोंदवला आहे. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत या दोन संघानी प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. गुजरात टायटन्स संघाने तीन ही सामने जिंकले असून ते सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर हैदराबाद संघाने आपल्या तीनपैकी एक सामन्यात विजय मिळवला असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे हा संघ दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे.
आजचा सामना सनरायझर्स हैदराबादसाठी ( Sunrisers Hyderabad ) महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून संघाला आणखी दोन गुण मिळवायचे प्रयत्न असणार आहे. आयपीएलच्या या मोसमात हैदराबाद संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या सामन्यात सनरायझर्सचा राजस्थान रॉयल्सकडून 61 धावांनी पराभव झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने त्यांचा 12 धावांनी पराभव केला.