मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 50 वा सामना गुरुवारी (5 मे) ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई येथे खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार ऋषभ पंत ( Rishabh Pant ) आणि केन विल्यमसन ( Kane Williamson ) यांच्यात नाणेफेक पार पडली. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा ( Sunrisers Hyderabad opt to bowl ) निर्णय.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाने ( Delhi Capitals Team ) नऊ सामने खेळले आहेत. ज्यापैकी त्यांना चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे, तर पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे या संघाचे आठ गुण असून संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दुसरीकडे हैदराबाद संघाने ( Sunrisers Hyderabad Team ) देखील नऊ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या संघाचे दहा गुण असून गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे.
आयपीएल इतिहासात दिल्ली आणि हैदराबाद संघांमध्ये आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी दिल्लीने 9 आणि हैदराबादने 11 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स संघात आज तिघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. यामध्ये श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी आणि सिन एबॉटचा समावेश आहे.