महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 SRH vs KKR : नाणेफेक जिंकून हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय; फलंदाजी करण्यासाठी कोलकाता सज्ज

आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( SRH vs KKR ) संघात सामना होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातवाजता सुरुवात होणार आहे. त्या अगोदर सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी ( Sunrisers Hyderabad opt to bowl ) करण्याचा निर्णय घेतला आहे.

SRH vs KKR
SRH vs KKR

By

Published : Apr 15, 2022, 7:21 PM IST

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 25 वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Night Riders ) संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातवाजता सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेड डू हेड मॅच - आतापर्यंत हेड डू हेड मॅचमध्ये, केकेआरचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वरचष्मा राहिला आहे. केकेआरने 14 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबादने 7 सामने जिंकले आहेत. सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने 397 धावा केल्या आहेत. याशिवाय केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही ( Shreyas Iyer ) हैदराबादविरुद्ध आतापर्यंत 378 धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने केकेआरविरुद्ध 223 धावा केल्या आहेत. उमेश यादवने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 12 विकेट घेतल्या आहेत. तसेच भुवनेश्वर कुमार केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन):आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, सुनील नरेन, उमेश यादव, अमन हकीम खान आणि वरुण चक्रवर्ती.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन.

हेही वाचा -T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडीवर आयपीएलचा परिणाम दिसणार का?

ABOUT THE AUTHOR

...view details