मुंबई -आयपीएलच्या पंधराव्या ( IPL 2022 ) हंगामातील 46 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( SRH Vs CSK ) यांच्यात होणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. हैदराबादने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Sunrises Hyderabad Won Toss Opted Bowl )आहे.
आयपीएलमध्ये सध्याच्या परिस्थितीत सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. हैदराबादने आठ सामने खेळले आहेत. त्यातील 5 सामन्यांत विजय मिळाला आहे. तर, 3 सामन्यांतील विजयासह 10 गुण मिळाले आहेत. त्याचसोबत चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे. चेन्नईने आतापर्यंत 9 सामने खेळले असून, त्यातील 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 6 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला असून, 4 गुण मिळाले आहेत.
धोनीची अग्निपरीक्षा - आयपीएल मध्यावर आली असताना महात्वाची घडामोड चेन्नई संघात घडली आहे. रविंद्र जडेजाने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा धोनीकडे आले आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच रविंद्र जडेजाला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, कर्णधार पदी नियुक्ती केल्यानंतर संघाची आणि जडेजाची कामगिरी फार चांगली राहिली नाही. त्यामुळे आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जडेजा कर्णधार पदावरुन पाय उतार झाला. त्यामुळे तळाला पोहचलेल्या संघाला प्लेऑफमध्ये आणण्यासाठी आता धोनीला आज अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.