महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Final : सॅमसनच्या पत्नीने थेट बीसीसीआयशी घेतला पंगा - Cricket News

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा अंतिम सामना खेळण्याच्या तयारीत आहे. राजस्थानने शुक्रवारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, कॅप्टन संजूशी संबंधित एक बातमी समोर आली आहे.

Sanju Samson wife
Sanju Samson wife

By

Published : May 29, 2022, 7:09 PM IST

हैदराबाद:आयपीएल 2022 चा अंतिम सामना आज होणार आहे, ज्यामध्ये संजू सॅमसनचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. रात्री ८ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दरम्यान, कॅप्टन संजूशी संबंधित एक बातमी ( News related to Captain Sanju ) समोर आली आहे. चारुलत सॅमसनने आपली एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत बीसीसीआय आणि प्रसारणकर्ता यांच्या कामावर बोट ठेवले ( Sanju Samson wife directly messing bcci ) आहे.

राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघाने 2008 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतर हा संघ कधीच अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यावेळी संघाने 14 वर्षांनंतर आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये पोहचत इतिहास रचला आहे.

आता मुद्दा जाणून घ्या, सॅमसनच्या पत्नीने काय केले?

  • संजू सॅमसनच्या पत्नीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी केली शेअर .
  • व्हिडिओमधून काढले स्टोरीचा फोटो.
  • फोटोमध्ये राजस्थान रॉयल्स संघातील कोणताही खेळाडू दिसत नव्हता.
  • यानंतर संजूच्या पत्नीने या फोटोची उडवली खिल्ली.

ती इन्स्टा स्टोरी इथे पहा -

इंस्टाग्राम स्टोरी

राजस्थान संघाला क्वालिफायर-1 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. संजूच्या संघाला गुजरातने पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. त्याचवेळी आज राजस्थानला विजेतेपद मिळवण्याची तसेच त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. दुसरीकडे गुजरातचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

या संघात हार्दिक पांड्या, राशिद खान, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया सारखे खेळाडू आहेत आणि ते सर्वजण धमाकेदार फॉर्मात आहेत. तसेच संघाची गोलंदाजीही अप्रतिम आहे. राजस्थानच्या बाजूने बटलरची बॅट आग ओकत आहे, परंतु संघाचे उर्वरित फलंदाज त्यांच्या नावाप्रमाणे कामगिरी करू शकत नाहीत. त्यामुळे संघाची हीच सर्वात मोठी समस्या आहे.

हेही वाचा -Ipl 2022 Prize Money : आयपीएल फायनल जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या संघालाल मिळणार 'एवढे' पैसे

ABOUT THE AUTHOR

...view details