कोलकाता : आयपीएल 2022 मधील पहिला क्वालिफायर सामना ( IPL 2022 1st Qualifier Match ) मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द गुजरात टायटन्स संघात पार पडला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव ( GT beat RR by 7 Wickets ) केला. त्याचबरोबर फायनल तिकीट मिळवले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने मोठी प्रतिक्रिया ( Captain Sanju Samson Statement ) दिली आहे. सॅमसनच्या मते, त्याच्या फलंदाजांनी खूप चांगली धावसंख्या उभारली होती, पण दुसऱ्या डावात फलंदाजी खूप सोपी झाली आणि गुजरात टायटन्सने चांगली कामगिरी करत सामना जिंकला.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावा केल्या. जोस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. तसेच सॅमसनने 26 चेंडूत 47 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स शेवटच्या षटकात अवघ्या तीन विकेट्स गमावून जिंकले. डेव्हिड मिलरने ( David Miller ) 38 चेंडूत 3 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार लगावत नाबाद 68 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 5 चौकार फटकावत नाबाद 40 धावा केल्या.
आमच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, पण दुसऱ्या डावात खेळपट्टी खूपच सोपी झाली - संजू सॅमसन