पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 39 वा सामना मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने बंगळुरूवर 29 धावांनी मात करत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले. या विजयात रियान पराग आणि कुलदीप सेनची भूमिका राहिली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 144 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 115 धावांवर आटोपला. या सामन्यानंतर हर्षल पटेलने ( Harshan Patel ) अगोदर झालेल्या वादामुळे रियान परागशी ( Riyan Parag ) हस्तांदोलन करण्यास नकार दिला.
20 व्या षटकानंतर रियान आणि हर्षल मध्ये झाला होता वाद - झाले असे की, 19व्या षटकाच्या अखेरीस राजस्थानने 126/8 धावा केल्या होत्या आणि पराग 25 चेंडूत 38 धावा खेळत होता. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकात परागने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. त्याने आपले अर्धशतक पूर्ण करताच परागने एका षटकाराने डाव संपवला आणि शेवटच्या षटकात हर्षलने एकूण 18 धावा केल्या. पराग 31 चेंडूत 56 धावा करून नाबाद राहिला, ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. परागने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. हर्षलने चार षटकांत 33 धावा देत एक बळी घेतला.