मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तेरावा सामना आज वानखेडे मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यांची नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ( Royal Challengers Bangalore ) प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला आमंत्रित केले होते. त्यानुसार राजस्थान रॉयल्स संघाने जोस बटलरच्या ( Batsman Jose Butler ) दमदार अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत 3 बाद 169 धावा केल्या आहेत. तसेच आरसीबी संघाला 170 धावांचे लक्ष्य दिले आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला झटका यशस्वी जयस्वालच्या रुपाने बसला. त्याला दुसऱ्या षटकांत विलीने बाद केले. त्यामुळे तो 4 धावा काढून परतला. त्यानंतर जोस बटरल आणि देवदत्त पडीकलने दुसऱ्या विकेट्साठी शानदार 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर देवदत्त 37 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर आलेला कर्णधार संजू सॅमसन देखील 8 धावांवर परतला.