मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या हंगामातील 30 वा सामना सोमवारी (एप्रिल 18) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders ) संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson ) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांच्यात नाणेफेक पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाला ( Rajasthan Royals Team ) आपले पाचपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघाने देखील सहा सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तसेच हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. दोन्ही संघांना आपल्या मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड - आयपीएलच्या पहिल्या हंगामातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात 25 सामने खेळले गेले आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे पारडे जड राहिले आहे. कारण 25 सामन्यांपैकी 13 सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 11 सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला आहे. तसेच दोन्ही संघातील एका सामन्याचा निकाल लागला नाही.