नवी मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 58 वा सामना डी. व्हाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals vs Rajasthan Royals ) संघात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 8 गडी राखून पराभव ( Delhi Capitals won by 8 wickets ) झाला. सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की सामन्यात नशिबाची साथ मिळाली नाही. त्यामुळे पराभव पत्करावा लागला.
नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2022 च्या 58व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. रविचंद्रन अश्विन ( Spinner Ravichandran Ashwin ) (50) आणि देवदत्त पडिक्कल (48) यांच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 160 धावा केल्या. प्रत्युत्तरात मिचेल मार्श (89) आणि डेव्हिड वॉर्नर (52*) यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे दिल्लीने 18.1 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
सामना संपल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला, 'आम्हाला नशिबाची साथ मिळाली ( We were not lucky ) नाही. काही झेल सुटले आणि एका फलंदाजाचा चेंडू स्टंपवर आदळला, पण बेल्स पडल्या नाहीत. सॅमसन म्हणाला, 'ती खूप निराशाजनक रात्र होती. आम्ही काही धावांनी आणि काही विकेट्स मागे होतो. आम्ही फलंदाजी करत होतो, तेव्हा विकेटमध्ये दुहेरी उसळी होती. आम्हाला वाटले आम्ही 15 धावा कमी केल्या.