मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 13 वा सामना मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore ) संघात संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. या अगोदर दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन सामने पार पडले आहेत. राजस्थान संघाने आपले दोन्ही सामने जिकंले आहेत. त्यामुळे ते चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. त्याचबरोबर बंगळुरु संघाने आपल्या दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे आणि एका सामन्यात पराभव झाला आहे.
आरसीबीने (Royal Challengers Bangalore ) शेवटचा सामना जिंकला असला तरी त्यांच्या फलंदाजांची कामगिरी फारशी छाप पाडू शकली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिसला आतापर्यंत आघाडीच्या फळीत मोठी खेळी करता आली आहे. फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकचा शानदार फॉर्म राजस्थान रॉयल्ससाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. ग्लेन मॅक्सवेलच्या अनुपस्थितीमुळे फिरकीपटूंविरुद्ध चांगला मानल्या जाणाऱ्या संघाला निश्चितच त्रास होईल. संघाच्या गोलंदाजी युनिटने चांगली कामगिरी केली आहे आणि मोहम्मद सिराज उर्वरित गोलंदाजांचा मार्ग सोपा करण्यासाठी सलामीचे झटके देऊ शकतो.
राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघ सर्व विभागांमध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि आरसीबीविरुद्धही संघ आपली लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. संघाने आपल्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 23 धावांनी पराभव केला आहे. टॉप ऑर्डरमध्ये जोस बटलर आणि संजू सॅमसन हे विरोधी वेगवान गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्याचबरोबर गोलंदाजीची कामगिरीही चांगली झाली असून त्यामुळे संघाने बचाव करताना दोन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात 25 सामने खेळले गेले आहेत.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील आकडेवाडी -
1. हेड टू हेड नंबरमध्ये, आरसीबीचा प्रभाव राहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 सामने जिंकले असून राजस्थान रॉयल्सने 10 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यांचा निकाल लागला नाही.
2. दोन्ही संघांमधील शेवटचे 4 सामने आरसीबीने जिंकले आहेत.