महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 GT vs LSG : आरसीबी समोर आज गुजरातचे आव्हान; बंगळुरुसाठी करो या मरोची स्थिती

आयपीएल 2022 च्या 67 व्या लीग सामन्यात गुरुवारी गुजरात आणि बंगळुरु ( GT vs LSG ) आमने सामने येणार आहेत. गुजरात टायटन्सचा संघ आधीच प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी खुप महत्वाचा आहे. कारण हा संघ 14 गुणावर आहे आणि प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी संंघर्ष करत आहे.

By

Published : May 19, 2022, 3:28 PM IST

मुंबई:गुरुवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 67 वा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना गुणतालिकेत पहिल्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या संघात होणार आहे, म्हणजेच गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore ) संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. हा सामना आरसीबी संघाच्या दृष्टीने खुप महत्वाचा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ( Royal Challengers Bangalore Team ) आतापर्यंत तेरा सामने खेळले आहेत. त्यापैकी सात सामन्यात विजय मिळवण्यात संघाला यश मिळाले आहे. त्याचबरोबर या संघाला सहा सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे संघाचे 14 गुण असून संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तसेच संघ अजून प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे या संघाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा असणार आहे.

गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. या संघाने तेरा सामन्यात 10 विजयासह गुणतालिकेत 20 गुणांची कमाई केली आहे. गुजरात संघ प्लेऑफमध्ये पोहचणार पहिला संघ आहे. त्यामुळे या संघासाठी हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत ऋद्धिमान साहाने आक्रमक खेळ करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. दुसरीकडे, राशिद खान गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने विकेट घेत आहे. मात्र, संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याचा फलंदाजीचा फॉर्म नक्कीच चिंतेचा विषय असेल. त्याचवेळी गुजरातला अजूनही एकही विश्वासार्ह नंबर 3 फलंदाज सापडलेला नाही. आरसीबीविरुद्ध, संघ काही खेळाडूंना विश्रांती देऊन पर्याय वापरून पाहू शकतो.

आरसीबीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाबकडून मोठा पराभव पत्करावा लागला होता आणि त्याचा परिणाम त्यांच्या धावगतीवरही झाला होता. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी संघाला गुजरात टायटन्सचा पराभव करावा लागणार आहे. गेल्या सामन्यात संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड चांगलाच महागडा ठरला आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात महागडा स्पेल होता. याशिवाय विराट कोहलीचा खराब फॉर्म आणि मोहम्मद सिराजची गोलंदाजीही संघासाठी अडचणीची ठरली आहे. मात्र, रजत पाटीदार आणि वानिंदू हसरंगा या खेळाडूंनी आतापर्यंत संघासाठी शानदार खेळ दाखवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन,शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, छमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार आणि सिद्धार्थ कौल.

गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंग, बी साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानउल्ला गुरबाज, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, रशीद खान, रवी श्रीनिवासन, साई किशोर, वरुण आरोन आणि यश दयाल.

हेही वाचा -Lsg Vs Kkr : शेवटच्या दोन चेंडूंनी कोलकात्याचा 'खेळ' बिघडवला, लखनौ 2 धावांनी विजयी

ABOUT THE AUTHOR

...view details