मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 60 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज ( Royal Challengers Bangalore vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला शुक्रवारी (12 मे) संध्याकाळी साडेसातला ब्रेबॉर्न स्टेडियवर सुरुवात होणार आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना जिंकणे खुप महत्वाचे आहे. ज्यामुळे दोन्ही संघाचे प्लेऑफचे भवितव्य ठरणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि मयंक अग्रवाल यांच्यात नाणेफेक पार पडली आहे.रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Royal Challengers Bangalore opt to bowl ) आहे.
रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु संघ ( RCB Team ) 12 पैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एक विजय आवश्यक आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्जने 11 पैकी 5 सामने जिंकले असून ते 10 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन):जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, मयंक अग्रवाल (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार आणि अर्शदीप सिंग.