मुंबई:आयपीएल 2022 च्या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( MI vs DC ) संघात पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 4 विकेट्सने मुंबई संघाला पराभवाचे पाणी पाजले. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला दुसरा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला ( Captain Rohit Sharma fined ) सामन्यादरम्यान षटकांची गती कमी ( Slow Over Rate ) राखल्याबद्दल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians team ) संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 177 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली संघाने अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी सातव्या विकेट्साठी नाबाद 75 धावांची खेळी करताना 18.2 षटकांत 6 बाद 179 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याचबरोबर कुलदीप यादवने देखील गोलंदाजीमध्ये योगदान देताना 3 विकेट्स घेतल्या.