महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Rohit Sharma Tweet : प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्माचे भावनिक ट्विट, म्हणाला... - cricket news

आयपीएल ( IPL 2022 ) च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने एक भावनिक ट्विट ( Rohit Sharma emotional tweet ) केले आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

By

Published : Apr 25, 2022, 9:34 PM IST

मुंबई:आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians ) कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मोसमातील पहिल्या विजयासाठी आसुसलेल्या मुंबईला रविवारी रात्री लखनौ सुपर जायंट्सकडून ( Lucknow Super Giants ) आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह मुंबई आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ बनला आहे. मुंबईच्या या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने एक भावनिक ट्विट केले ( Rohit Sharma emotional tweet ) आहे.

रोहित शर्माने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करताना लिहिले की, "आम्ही या स्पर्धेत आमची सर्वोत्तम कामगिरी केली नाही, परंतु असे घडते. अनेक क्रीडा दिग्गज या टप्प्यातून गेले आहेत, परंतु मला हा संघ आणि तेथील वातावरण आवडते. त्याच बरोबर या संघावर आत्तापर्यंत ज्यांनी विश्वास आणि अतूट निष्ठा दाखवली त्या हितचिंतकांचेही आम्ही कौतुक करू इच्छितो."

सलग आठव्या पराभवानंतर शर्यतीतून बाद होणारा पहिला संघ बनल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) स्वीकारले की, त्याच्या संघाने सर्वोत्तम प्रयत्न केले नाहीत, पण असे घडते. रविवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 36 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने, मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर ( MI out of play-off race ) पडला आहे. आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी सध्याचा हंगाम खूप कठीण राहिला आहे.

आयपीएलच्या मोठ्या लिलावात मुंबईने हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) आणि कृणाल पांड्याला कायम ठेवले नाही, ज्यांनी गेल्या काही वर्षांत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्णधार रोहितशिवाय मुंबईने सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि किरॉन पोलार्ड यांना कायम ठेवले होते. मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. तसेच सर्वाधिक बोली लावून संघात समावेश करण्यात आलेला इशान किशन सद्धा आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे.

हेही वाचा -Graeme Smith : ग्रॅमी स्मिथला मोठा दिलासा, वर्णद्वेषाच्या आरोपातून झाली मुक्तता

ABOUT THE AUTHOR

...view details