मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात आज आरसीबी ( Royal Challengers Bangalore ) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) हे संघ आमनेसामने आहेत. हा सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव 18.5 षटकांत सर्वबाद 128 धावांवर गुंडाळला गेला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाला विजयसाठी 129 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या केकेआर संघाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला धक्का व्यंकटेश अय्यरच्या (13) रुपाने 14 धावांवर बसला. त्यानंतर मागील सामन्यात शानदार कामगिरी करणारा अजिंक्य रहाणे काही खास कामगिरी करु शकला नाही. तो वैयक्तिक 9 धावांवर परतला. तसेच ही सलामी जोडी बाद झाल्यानंतर आलेला नितेश राणा (10) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (13) जलद बाद झाले. त्यामुळे केकेआरचा संघ चांगला अडचणीत सापडला. त्यानंतर ही सातत्याने विकेट्स पडत राहिल्या.
कोलकाता संघाकडून सर्वाधिक धावा आंद्रे रसेल (25) आणि उमेश यादवने (18) केल्या. तसेच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव 18.5 षटकांत सर्वबाद 128 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाला विजयसाठी 129 धावांचे लक्ष्य मिळाले.रॉयल चॅलेंजर्स बंघळुरु संघाकडून गोलंदाजी करताना सामन्यात वानिंदू हसरंगाने (4/20) सर्वाधिक विकेट्स घेतल्या त्याचबरोबर आकाश दीपने 3 आणि हर्षल पटेलने 2 विकेटस् घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने एक विकेट्स घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाणेफेक जिंकून ( Royal Challengers Bangalore won the toss ) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स वगळता एका ही संघाला धावांचा बचाव करता आलेला नाही. आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाच सामने पार पडले असून प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे.