महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022: सीएसकेच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार जडेजाने दिली प्रतिक्रिया; म्हणाला... - Sports News

पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 54 धावांनी पराभव पत्करावा लागला. हा पराभव चेन्नईचा या हंगामातील सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे चेन्नई संघाच्या अडचणीत नक्कीच वाढल्या आहेत. त्यावर आता कर्णधार रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

By

Published : Apr 4, 2022, 4:00 PM IST

मुंबई: आयपीएल 2022 च्या हंगामातील अकरावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने लियाम लिव्हिंगस्टोनच्या ( Liam Livingstone ) अष्टपैलू खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सचा 54 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला, तर चेन्नई संघाचा या हंगामातील सलग तिसरा पराभव झाला. यावर आता कर्णधार रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया ( Ravindra Jadeja's reaction ) दिली आहे.

संघाचा नवा कर्णधार रविंद्र जडेजा ( Captain Ravindra Jadeja ) याने सलग तिसऱ्या पराभवाबद्दल बोलताना सांगितले की, आम्हाला मजबूत पुनरागमन करावे लागेल आणि आम्ही प्रयत्न करू. रविंद्र जडेजाने पुढे म्हणाला की, पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट गमावल्या, पहिल्या चेंडूपासून आम्हाला गती मिळाली नाही. आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी आणि मजबूत परत येण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. गायकवाड यांच्याबाबत जडेजा म्हणाला की, आपल्याला त्याला आत्मविश्वास देण्याची गरज आहे, त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे, तो खूप चांगला खेळाडू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

जडेजा पुढे म्हणाला की, आम्ही त्याला (गायकवाड) ( Ravindra Jadeja on Ruturaj Gaikawad ) निश्चितपणे पाठिंबा देऊ आणि मला खात्री आहे की तो चांगले पुनरागमन करेल. तो (दुबे) चांगली फलंदाजी करत आहे, आज त्याने चांगली फलंदाजी केली, त्याचे मन चांगल्या चौकटीत ठेवणे महत्त्वाचे ठरेल. आम्ही निश्चितपणे आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, कठोर परिश्रम करू आणि मजबूत पुनरागमन करू.

या सामन्याची नाणेफेक जिंकून सीएसकेने प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाब संघाला आमंत्रित केले होते. त्यानुसार पंजाबने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 180 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सीएसके संघाला 181 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ 18 व्या षटकात 126 धावांवर सर्वबाद झाला. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने वादळी अर्धशतक ठोकताना सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. त्याचबरोबर चेन्नईकडून शिवम दुबेने आक्रमक खेळी ( Shivam Dubey's aggressive play ) करताना, सर्वाधिक 57 धावांची खेळी साकारली.

हेही वाचा -IPL 2022 Updates : मुंबईच्या सलग दुसऱ्या पराभवावर तिलक वर्माची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...

ABOUT THE AUTHOR

...view details