पुणे - राजस्थान रॉयल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात या आयपीएलमधील मोठा विजय मिळवला आहे. आयपीएलमधील या संघाने पहिल्याच सामन्यात हैदराबादचा धुव्वा उडवला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २१० धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला सुरुवातीपासूनच जोरदार धक्के बसले. (SRH vs RR) शेवटी त्यांना ६१ धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला. यंदाच्या आयपीएलधील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे.
राजस्थानला पहिला धक्का बसला - राजस्थानच्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला दुसऱ्याच षटकात कर्णधार केन विल्यम्सचा मोठा धक्का बसला. या धक्क्यातून हैदराबादचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांना पराभव स्विकारावा लागला. सुरूवातीला राजस्थानने यावेळी सावध पवित्रा घेतला होता. (Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Match) पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्यांनी फटकेबाजीवर भर दिला. राजस्थानच्या जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी यावेळी ५८ धावांची दमदार सलामी दिली. यशस्वी यावेळी २० धावांवर बाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला.
बटलर बाद झाल्यावर पडीक्कल फलंदाजीला आला - यशस्वीनंतर कर्णधार संजू सॅमसन फलंदजाीला आला. त्यावेळी राजस्थानच्या संघाने प्लॅन बदलल्याचेच यावेळी पाहायला मिळाले. संजू फलंदाजीला आल्यावर राजस्थानच्या धावांचा वेग वाढायला सुरुवात झाली. पण त्यावेळी राजस्थानला जोस बटलरच्या रुपात दुसरा धक्का बसला. बटलरने यावेळी तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३५ धावांची दमदार खेळी साकारली. बटलर बाद झाल्यावर देवदत्त पडीक्कल फलंदाजीला आला आणि त्याच्याबरोबर संजूने हैदराबादच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.