मुंबई:इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 24 वा सामना गुरुवारी (14 एप्रिल) खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातवाजता डीवाय पाटील स्टेडियमवर सुरु होईल. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आपला चौथा विजय नोंदवण्यासाठी कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson ) आणि हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली उतरतील.
राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघाने आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चार सामने खेळले आहेत. या चार सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे संघाचे सहा गुण आहेत आणि हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्याचबरोबर गुजरात संघाने देखील चार सामन्यापैकी तीन सामन्यात विजय, तर एका सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह पाचव्या स्थानी आहे. या दोन संघातील सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
गुजरात टायटन्सच्या ( Gujarat Titans ) कमी अनुभव असलेल्या फलंदाजांसाठी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीला सामोरे जाणे कठीण आव्हान असेल. हा नवा संघ फलंदाजीत शुबमन गिल ( Shubman Gill ) आणि पंड्या या युवा सलामीवीरांवर जास्त अवलंबून आहे. गिल चांगलाच फॉर्मात आहे, पण झटपट धावा काढण्यासाठी ओळखला जाणारा कर्णधार त्याच्या फलंदाजीत अधिक सावध दिसतो आणि डावाला खोलवर नेण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो.