मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 63 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Rajasthan Royals vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियवर साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी संजू सॅमसन आणि केएल राहुल यांच्यात नाणेफेक पार पडली. राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( Rajasthan Royals opt to bat ) घेतला आहे.
लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super giants team ) आतापर्यंत 12 सामन्यात 8 विजयासह 16 गुण मिळवले आहे. त्याचबरोबर या संघाचा चार सामन्यात पराभव झाला आहे. तसेच हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals team ) 12 सामन्यात सात विजयासह 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स संघाला आतापर्यंत पाच सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला होता.