महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 29, 2022, 2:18 PM IST

ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : राजस्थान रॉयल्सच्या माजी सलामीवीराने सांगितले संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. या संघाबद्दल त्यांचा माजी सलामीवीर ग्रॅमी स्मिथने ( Former opener Graeme Smith ) राजस्थान रॉयल्स संघावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संघातील महत्वाच्या वैशिष्ट्याकडे लक्ष वेधले आहे.

RR
RR

हैदराबाद : आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने दमदार प्रदर्शन केले आहे. राजस्थान रॉयल्स संघाने ( Rajasthan Royals Team ) फक्त एकाच विभागात नाही, तर सर्व विभागात कामगिरी केली आहे. हा संघ 40 सामन्यानंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत देखील अव्वल स्थानी आहे. अशा या संघाबद्दल त्यांचा माजी सलामीवीर ग्रॅमी स्मिथने राजस्थान रॉयल्स संघावर ( Graeme Smith reaction ) मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रॅमी स्मिथने सांगितले की, या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सकडे ( Rajasthan Royals ) असे गोलंदाज आहेत, ज्यांचा प्रभाव मोठा आहे आणि त्याचा संघाला फायदा होत आहे. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंत 8 पैकी 6 सामने जिंकले असून केवळ दोनच सामने गमावले आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात संघाला 144 धावा करता आल्या, पण तरीही गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्यांनी मोठा विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सचे सध्या 12 गुण आहेत.

राजस्थान रॉयल्सकडे विकेट घेणारे गोलंदाज आहेत - ग्रॅमी स्मिथ
ग्रॅमी स्मिथच्या ( Graeme Smith ) मते, राजस्थान रॉयल्सकडे असलेले सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत आणि म्हणूनच ते कमी धावसंख्येचा बचाव करण्यास सक्षम आहेत. क्रिकेट डॉट कॉम च्या वृत्तानुसार, स्मिथ म्हणाला, आयपीएलमध्ये प्रभावशाली गोलंदाज असणे खूप महत्त्वाचे आहे आणि राजस्थान रॉयल्सकडे असे गोलंदाज आहेत. कृष्णा, कुलदीप सेन आणि ट्रेंट बोल्टसारखे प्रसिद्ध गोलंदाज विकेट घेणारे आहेत. असे अनेक संघ आहेत जे उच्च धावसंख्येच्या सामन्यातही विकेट घेऊ शकत नाहीत, परंतु राजस्थान रॉयल्स हे काम खूप उत्तम प्रकारे करत आहे. कुलदीप सेन हा विकेट घेणारा गोलंदाज आहे. तो उत्तम चेंडू टाकू शकतो. प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी केली. तो मोठ्या लयीत दिसत होता. संघाच्या दोन्ही फिरकीपटूंची कामगिरीही उत्कृष्ट झाली आहे.

ग्रॅमी स्मिथनेही रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीचे कौतुक ( Ravichandran Ashwin bowling ) केले. तो म्हणाला, आपल्या सर्वांना माहित आहे की अश्विनचा कसोटी सामन्यांमध्ये विक्रम खूप चांगला आहे. पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याचे आकडेही खूप चांगले आहेत. या आयपीएलमध्ये तो फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दिसत आहे. त्याच्याकडे ती विविधता आणि नियंत्रण आहे. त्याची गोलंदाजी उत्कृष्ट होती.

हेही वाचा -IPL 2022 Updates : आम्ही पहिल्या हाफमध्ये ज्या प्रकारे खेळलो, त्याबद्दल कोणतेही कारण देऊ शकत नाही - कर्णधार श्रेयस अय्यर

ABOUT THE AUTHOR

...view details