महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 1st Qualifier RR vs GT : गुजरात टायटन्स समोर आज राजस्थान रॉयल्सचे चॅलेंज; कोण पटकावणार फायनलचे तिकिट? - आयपीएल 2022 पहिला क्वालिफायर

आयपीएल 2022 सीझनचा क्वालिफायर-1 24 मे रोजी संध्याकाळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या सामन्यात गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) हे संघ आमनेसामने असतील. खरं तर, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स ( GT ) गुणतालिकेत पहिल्या स्थानावर तर राजस्थान रॉयल्स ( RR ) दुसऱ्या स्थानावर आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल. तर पराभूत संघाला क्वालिफायर 2 मध्ये खेळण्याची आणखी एक संधी मिळेल.

RR vs GT
RR vs GT

By

Published : May 24, 2022, 3:15 PM IST

कोलकाता:इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी (24मे) आयपीएल 2022 मधील पहिला सामना ( First qualifier match ) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला ईडन गार्डन्स येथे सुरु होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे.

आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत गुजरातने साखळी टप्प्यात सर्वोत्तम खेळ केला आणि त्यांच्या 14 पैकी 10 सामने जिंकले. तर राजस्थानने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. या आधी दोन्ही संघात एक सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये राजस्थान संघाला 37 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans Team ) त्यांच्या एकत्रित कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि लीग टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला. गरजेच्या वेळी वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान दिले आणि हेच या संघाच्या यशाचे रहस्य आहे. मात्र, आता चुकांना जागा नाही आणि त्यामुळेच संघाला कोणत्याही प्रकारची चूक करायला आवडणार नाही. कर्णधार हार्दिक पंड्याने ( Captain Hardik Pandya ) आघाडीचे नेतृत्व केले आणि बॅट आणि चेंडूने योगदान दिले.

पॉवरप्लेमध्ये झटपट धावा करून वेगवान सुरुवात करण्याचे काम वृद्धीमान साहाने केले आहे. मात्र, संघाला दुसरा सलामीवीर शुभमन गिलकडूनही ( Opener Shubhaman Gill ) योगदानाची अपेक्षा असेल. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी अनेक वेळा संघाला वाचवले आहे, तर रशीद खान बॅट आणि चेंडूने अष्टपैलू खेळ दाखवण्यात मागे राहिलेला नाही. मोहम्मद शमी आणि यश दयाल यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तथापि, क्वालिफायर 1 मध्ये, संघ लोकी फर्ग्युसन आणि अल्झारी जोसेफ यांच्यापैकी कोणाची निवड करतो हे पाहणे मनोरंजक असेल.

राजस्थान रॉयल्सने ( Rajasthan Royals Team ) संपूर्ण लीग टप्प्यात बरेच सातत्य दाखवले आणि प्लेऑफमध्येही ते कायम राहीले. लीग टप्प्यातील पहिल्या काही सामन्यांमध्ये जोस बटलरने बॅटने चांगल्या धावा केल्या होत्या, पण शेवटच्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅट थंडावली आहे. मात्र, मोठ्या सामन्यात त्यांचा स्टार फलंदाज धावा करेल अशी संघाला पूर्ण आशा असेल. यशस्वी जैस्वाल जबरदस्त फॉर्ममध्ये ( Yashaswi Jaiswal in tremendous form ) आहे आणि पुनरागमन केल्यापासून त्याने चांगली फलंदाजी केली आहे.

कर्णधार संजू सॅमसन ( Captain Sanju Samson ), देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायर यांनीही चांगले योगदान दिले आहे. दुसरीकडे रियान परागने गरजेच्या वेळी चांगली फलंदाजी केली आहे. रविचंद्रन अश्विनने ( All-rounder Ravichandran Ashwin ) संघासाठी अष्टपैलू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. युझवेंद्र चहल हा गोलंदाजीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असून त्याच्याकडून वेग कायम राखण्याची अपेक्षा केली जाईल. वेगवान गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय या त्रिकुटाने चांगली गोलंदाजी केली आहे.

दोन संघ पुढीलप्रमाणे -

गुजरात टाइटन्स:हार्दिक पंड्या (कर्णधार), राशिद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी, रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर. साई किशोर, डॉमिनिक ड्रेक्स, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, बी. साई सुदर्शन, गुरकीरत सिंग मान आणि वरुण आरोन.

राजस्थान रॉयल्स:संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रशांत कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅककॉय, अनुय सिंग, जेम्स बोबिन नीशम , कुलदीप सेन, करुण नायर, रस्सी व्हॅन डर डुसेन, डॅरिल मिशेल, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव आणि शुभम गढवाल.

हेही वाचा -Tribute To Andrew Symonds : अँड्र्यू सायमंड्सला 27 मे रोजी वाहिली जाणार श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details