मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 28 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Punjab Kings vs Sunrisers Hyderabad ) संघात सुरु आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनने ( Captain Ken Williamson ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने लियाम लिव्हिंगस्टोनच्या 60 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 151 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद संघाल 152 धावांचे लक्ष्य दिले आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या पंजाब किंग्ज संघाची सुरुवात खराब झाली. पंजाब किंग्ज संघाला 2.4 षटकांत 10 धावसंख्येवर पहिला धक्का बसला. तो संघाचा नवा कर्णधार शिखर धवनच्या (8) रुपाने बसला. त्यानंतर दुसरा धक्का प्रभसिमरन सिंगच्या रुपाने बसला. त्याने 14 धावांचे योगदान दिले. त्यानंतर जॉनी बेअरस्टो (12), जितेश शर्मा (11) आणि ओडियन स्मिथ (13) धावांवर बाद झाले. तसेच राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग यांना भोपळा देखील फोडता आला नाही.