महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 PBKS vs GT : गुजरातच्या विजयी रथाला रोखण्याचे आज पंजाबसमोर आव्हान - आयपीएलच्या बातम्या

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा 16 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात 8 एप्रिल रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल. आयपीएलमध्ये दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजल्यापासून दोन्ही संघांमध्ये सामना रंगणार आहे. सामन्याची नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

PBKS vs GT
PBKS vs GT

By

Published : Apr 8, 2022, 4:32 PM IST

मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सोळावा सामना शुक्रवारी ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई ( Brabourne Stadium Mumbai ) येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Punjab Kings vs Gujarat Titans ) संघात लढत होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात पासून सुरु होईल. आतपर्यंत गुजरात टायटन्स संघाचे दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यात गुजरात अजिंक्य राहिला आहे. त्याचबरोबर तो या स्पर्धेतील हीच भूमिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तसेच पंजाब संघाने तीनपैकी दोन सामन्यात विजय आणि एकात पराभव स्वीकारला आहे.

गुजरात टायटन्स संघ सध्या चार गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच पंजाब किंग्स संघ ( Punjab Kings Team ) चार गुणांसह पाचव्या स्थानी आहे. दोन्ही संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल प्रथमच या हंगामात पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

गुजरात टायटन्सचा संघ ( Gujarat Titans Team ) शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करेल, तेव्हा उत्कृष्ट लयीत धावणाऱ्या वेगवान गोलंदाजांना विरोधी संघाच्या आक्रमक फलंदाजांचे आव्हान असेल. संघाची रचना आणि समतोल पाहता गुजरात आणि पंजाबमध्ये खूप फरक आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. जिथे खेळपट्टी खूप धावांसाठी ओळखली जाते.

आजच्या सामन्यासाठी हवामान आणि खेळपट्टी -ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांना मदतशीर असणार आहे. तसेच या मैदानात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दवाचा परिणाम दिसला होता. त्यानंतर फवारणी केल्यानंतर दवाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसल्याचे पाहिला मिळाले होते. त्याचबरोबर या सामन्यादरम्यान मुंबईतील तापमान जवळपास 31 डिग्री सेल्सियस असण्याची शक्यता आहे. तसेच 53 टक्के आद्रता आणि ताशी 11 किमीने वारा वाहिल अशी शक्यता आहे.

पंजाब किंग्ज संघची प्लेइंग इलेव्हन यामधून : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.

गुजरात टायटन्स संघाची प्लेइंग इलेव्हन यामधून :हार्दिक पंड्या (कर्णधार), रशीद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवाटिया, नूर अहमद, साई किशोर, विजय शंकर, जयंत यादव, डॉमिनिक ड्रेक्स, दर्शन नळकांडे, यश दयाल, यश अल दयाल. जोसेफ, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, वरुण आरोन आणि बिसाई सुदर्शन.

हेही वाचा -Ban on flags with sticks : लाठीसह झेंडे घेऊन आलेल्या चाहत्यांना पोलीस आणि बीसीसीआय रोकणार

ABOUT THE AUTHOR

...view details