मुंबईः इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 64 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Punjab Kings vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सोमवारी (16 मे) डॉ. डी. व्हाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली. पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पंजाबचा संघ ( Punjab Kings Team ) 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर असून त्यांचा निव्वळ त्यांचा नेट रन रेट दिल्ली पेक्षा कमी आहे. त्यांचा नेट रन रेट 0.023 आहे. दिल्लीच्या संघाचे देखील 12 गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट 0.210 चांगला असल्याने पाचव्या स्थानी आहे. ज्यामुळे दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध आठ गडी राखून विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ अधिक आत्मविश्वासाने सामन्यात प्रवेश करेल. तर पंजाब किंग्जनेही शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला आहे.