हैदराबाद:इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधाराव्या हंगामात आतापर्यंत 50 सामने खेळले गेले आहेत. तसेच या स्पर्धेचे 24 सामने खेळले जाणे बाकी आहेत. गुरुवारी आयपीएलच्या 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 21 धावांनी सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदवला, ज्यानंतर दहा संघांच्या गुणतालिकेत बदल पाहायला मिळाले.
गुरुवारी झालेल्या सामन्यानंतर या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. त्याचबरोबर हैदराबाद संघाची सहाव्या स्थानी घसरण ( Hyderabad team Sixth place ) झाली आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या डेव्हिड वॉर्नरने 92 धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या मोसमात त्याने चौथ्यांदा 50 चा टप्पा पार केला. तसेच डेव्हिड वॉर्नर आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. त्याचवेळी एक विकेट घेणारा कुलदीप यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलच्या जवळ आला आहे.
गुजरात टायटन्सचा संघ ( Gujarat Titans team ) सध्या गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सचे 14 गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच राजस्थान आणि बंगळुरूचे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. दोघांचे प्रत्येकी 12 गुण आहेत. दिल्लीचा संघ पाचव्या आणि सनरायझर्स हैदराबाद सहाव्या तर पंजाबचा संघ सातव्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे 10-10 गुण आहेत. कोलकाता आठ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि मुंबईचे संघ अजूनही नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असून दोघांच्याही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या आहेत.