महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 PBKS vs SRH : मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त; पंजाब संघाची धुरा 'या' खेळाडूच्या खांद्यावर

रविवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 28 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याला पंजाब संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल उपलब्ध नाही. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्जच्या नेतृत्वाची धुरा शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan ) खांद्यावर आहे.

PBKS
PBKS

By

Published : Apr 17, 2022, 6:26 PM IST

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील रविवारी 28 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Punjab Kings vs Sunrisers Hyderabad ) संघात साडेतीनवाजता सुरु झाला आहे. या सामन्याच्यासाठी मयंक अग्रवाल उपलब्ध नाही ( Mayank Agarwal is not available ). त्याला दुखापत झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

या सामन्याच्या नाणेफेकीला सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन ( Ken Williamson ) या सामन्याच्या उपस्थित होता. परंतु पंजाब संघाचा नियमित कर्णधार मयंक अग्रवाल मात्र नाणेफेकीसाठी आला नव्हता. त्याच्याऐवजी शिखर धवन ( Shikhar Dhawan ) नाणेफेकीसाठी आला होता. या सामन्याची नाणेफेक जिंकूण केन विल्यमसन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

मयंक अग्रवाल दुखापत ( Mayank Agarwal injured ) झाली असल्याने तो आजचा सामना खेळत नसल्यामुळे, त्याच्या जागी प्रभसिमरन सिंह ( Prabhasimaran Singh ) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 5 पैकी तीन सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांना 2-2 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या शेवटच्या 3 पैकी दोन सामने जिंकले आहेत आणि सनरायझर्स हैदराबादने त्यांचे शेवटचे तीन सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन -

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंग.

हेही वाचा -IPL 2022 GT vs CSK : रवींद्र जडेजाच्या सीएसके समोर आज हार्दिक पांड्याच्या गुजरातचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details