मुंबई - इंडियन प्रिमियर लीगमधील ( IPL 2022 ) 52 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती पार पडणार आहे. पंजाब सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना होणार आहे. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Punjab Win Toss Opt To Bat ) आहे.
आयपीएलमध्ये आजतागायत राजस्थानने 10 सामने खेळले असून, त्यातील 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर, चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थान गुणातालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाबने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यातील 5 विजयासह तेवढ्याच सामन्यांत पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलमधील गुणातालिकेत पंजाब 10 गुणांसह सातव्या स्थानी आहे.