मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 38 वा सामना आज (सोमवार) संध्याकाळी साडेलसातला वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज ( Chennai Super Kings vs Punjab Kings ) संघात होणार आहे. या सामन्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार रवींद्र जडेजा आणि मयंक अग्रवनाल यांच्यात नाणेफेक पार पडली. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी ( Chennai Super Kings opt to bowl ) करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई संघाने ( Chennai Super Kings Team ) मागील सामन्यात मुंबईवर विजय मिळवला होता, त्यामुळे चेन्नई संघ आपल्या पहिल्या रुपात असल्याचे दिसत आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ चार गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहेत. या अगोदर या हंगामतील 11 वा सामना दोन्ही संघात झाला होता. ज्यामध्ये पंजाब किंग्सने सीएसकेवर 54 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नईचा संघ हा बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.
दुसरीकडे पंजाब संघाला ( Punjab Kings Team ) आपल्या मागील सामन्यात दिल्लीकडून 9 विकेट्सने दारुन पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच या संघाने आपल्या सात सामन्यात तीन विजय आणि चार पराभव पत्कारले आहेत. म्हणून हा संघ गुणतालिकेत सहा गुणांसह आठव्या स्थानी आहेत. तसेच आयपीएलच्या संपूर्ण इतिहासात या दोन्ही संघात एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्यील पंधरा सामन्यात सीएसकेने बाजी मारली आहे. तसेच अकरा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे.