पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Mumbai Indians vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडणार आहे. या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Mumbai Indians opt to bowl ) घेतला आहे. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाब किंग्ज संघाला आमंत्रित केले आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पंधराव्या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. मुंबई इंडियन्स संघ सध्या चार सामन्यातील पराभवामुळे गुणतालिकेत सर्वात खाली दहाव्या स्थानी आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जचा संघ आपल्या चार सामन्यातील दोन विजय आणि दोन पराभवासह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
मुंबई आणि पंजाबचा इतिहास -आतापर्यंत दोन्ही संघात आयपीएलच्या इतिहासात 27 सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी 14 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 13 सामन्यात पंजाब किंग्ज संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघात नेहमीच काट्याची टक्कर पाहायला मिळाली आहे. तसेच आज ही तेच पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.