महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022n Updates : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या 'या' दोन खेळाडूंचे संघात कमबॅक

By

Published : Apr 28, 2022, 3:53 PM IST

आगामी सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी ( Good news for Delhi Capitals ) आली आहे. संघाचे स्टार खेळाडू मिचेल मार्श आणि टिम सेफर्ट पुन्हा एकदा सराव शिबिरात सहभागी झाले आहेत.

Delhi Capitals
Delhi Capitals

मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स गुरुवारी आपला आठवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे. या अगोदर दिल्ली कॅपिटल्ससाठी एक आनंदाची बातमी आहे की, त्यांचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श ( All-rounder Mitchell marsh ) आणि यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्ट ( Wicketkeeper-batsman Tim Seifert ) कोरोनामधून बरे झाल्यानंतर सरावाला परतले आहेत. याबाबतची माहिती दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने बुधवारी दिली.

गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झालेले दोन्ही क्रिकेटपटू अनिवार्य आयसोलेशन पूर्ण करून सरावासाठी संघात दाखल झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला मार्श आणि सेफर्ट दिल्ली कॅपिटल्सच्या सहकारी खेळाडूंसोबत सराव करताना दिसले.

दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals ) या दोन क्रिकेटपटूंचा सत्रादरम्यान सराव करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फ्रेंचाइजीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, छान वाटत आहे. तुम्हाला प्रशिक्षणावर पाहून आनंद झाला. गेल्या सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्शला कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर दोन दिवसांनी टीम सेफर्ट देखील पॉझिटिव्ह आला होता.

वॉटसननेही खेळाडूंना दिला सल्ला -दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन ( Assistant Coach Shane Watson ) यांनी त्यांच्या संघाला आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार स्पर्धेच्या उत्तरार्धात पूर्ण 40 षटके खेळण्याचे आवाहन केले आहे.

वॉटसन म्हणाला, प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला पूर्ण 40 षटकांपर्यंत सातत्याने सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आम्हाला माहित आहे की, आम्ही हे करू शकतो. तर, हे घडवून आणण्यासाठी आमच्या संघात असलेली अतुलनीय प्रतिभा ही नक्कीच सर्वात रोमांचक आहे. आम्हाला फक्त त्याचे पालन करायचे आहे आणि पुढील सात सामन्यांमध्ये एकत्र चांगले क्रिकेट खेळायचे आहे.

हेही वाचा -Tribute To Shane Warne : राजस्थान रॉयल्स आपला पहिला कर्णधार शेन वॉर्नला वाहणार श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details