मुंबई:इंडियन प्रीमियर लीग 2022 ( Indian Premier League 2022 ) या हंगामातील 56 वा सामना सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Kolkata Knight Riders vs Mumbai Indians ) संघात खेळला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि केवळ 10 धावांत पाच विकेट घेतल्या. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव 17.3 षटकांत सर्वबाद 113 धावांत आटोपला. या पराभवानंतर जसप्रीत बुमराहने महत्वाची प्रतिक्रिया दिली.
बुमराहची ( Fast bowler Jaspreet Bumrah ) चमकदार कामगिरी व्यर्थ गेली आणि मुंबईचा 52 धावांनी दारूण पराभव ( KKR Beat Mi By 52 Runs ) झाला. केकेआरकडून झालेल्या दणदणीत पराभवानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians Team ) आपल्या चुका सुधारेल आणि पुढच्या सत्रात जोरदार पुनरागमन करेल.
सामन्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, 'योगदान देणे नेहमीच चांगले वाटते, परंतु संघ जिंकणे हे महत्त्वाचे आहे. आम्हाला जिंकण्याची संधी होती, पण आम्ही ती गमावली. मी आकडेवारी आणि रेकॉर्डकडे लक्ष देत नाही. प्रक्रियेला चिकटून राहणे हे माझे मुख्य ध्येय आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून असेच होते.