मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 33 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात गुरुवारी (21 एप्रिल) होणार आहे. हा सामना डी वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून खेळला जाईल. तत्पुर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून एक बातमी समोर आली आहे. चेन्नईने घोषणा केली आहे की, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेच्या ( Fast bowler Adam Milne ) जागी आयपीएल 2022 च्या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी, त्यांनी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला ( Fast bowler Mathisha Pathirana ) संघात स्थान दिले आहे.
याबाबतची माहिती आयपीएलच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. 26 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केकेआर विरुद्ध सीएकेच्या पहिल्या सामन्यात, अॅडम मिल्नेने 2.3 षटकात एकही विकेट न घेता 19 धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याला दुखापत झाली ( Adam Milne was injured ) आणि आयपीएलच्या 2022 मधून तो बाहेर पडला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट वर्तुळात 'ज्युनियर लसिथ मलिंगा' ( Junior Lasith Malinga ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथिरानाची अॅक्शन मलिंगा सारखीच आहे. कॅंडीचा 19 वर्षीय तरुम उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आहे.