मुंबई: आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेजमधील शेवटचा सामना म्हणजेच 70 वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( Sunrisers Hyderabad vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सनरायझर्स हैदराबाद संघाची धुरा भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर आहे.
हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. कारण दोन्ही संघ या अगोदरच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आजचा हा सामना जिंकून हैदराबाद आणि पंजाब हे दोन्ही संघ स्पर्धेचा शेवट चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतील. पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले, तर हैदराबादचा संघ सहा विजयांसह 12 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. तर पंजाबचेही 12 गुण आहेत पण चांगल्या नेट रनरेटमुळे ते सातव्या स्थानावर आहेत.