मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 37 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Mumbai Indians vs Lucknow Super Giants ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला विजय नोंदवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने ( Mumbai Indians Team ) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सात सामने खेळले आहेत. या सात ही सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. दुसरीकडे लखनौ सुपरजायंट्स संघाने देखील सात सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यात विजय, तर तीन सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे या संघाचे 8 गुण आहेत. तसेच हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. या सामन्यात आतापर्यंतच्या कामगिरीनुसार लखनौ संघाचे पारडे मुंबईपेक्षा जड दिसत आहे.
लखनौ ( Lucknow Super Giants Team ) चांगल्या स्थितीत दिसत आहे. परंतु शेवटच्या सामन्यात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, लखनौने पहिल्या सत्राच्या सामन्यात मुंबईचा 18 धावांनी पराभव केला होता, त्यामुळे ते मनोबल वाढवत मैदानात उतरतील. मुंबईने तुकड्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण एक युनिट म्हणून कामगिरी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. एका मोसमात पहिले सात सामने हरणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. कर्णधार रोहित शर्माला कुठे गडबड सुरू आहे, हे कळत नसल्याचे दिसते.