मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants vs Delhi Capitals ) संघात होणार आहे. हा सामना गुरुवारी (7 एप्रिल) डी. वाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाणार आहे. या दोन्ही संघापैकी दिल्ली संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना गमावला आहे. तसेच लखनौ सुपरजायंट्स संघाचे तीन सामने झाले आहेत, त्यापैकी एका सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ ( Delhi Capitals Team ) सध्या गुणतालिकेत चार गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्याचबरोबर लखनौ सुपरजायंट्स चार गुणांसह पाचव्या स्थानी विराजमान आहेत. टीम सेफर्टच्या जागी आजच्या सामन्यासाठी वॉर्नरचा दिल्ली कॅपिटल्स संघात समावेश केला जाईल. तर स्टॉइनिस लखनौ संघात अँड्र्यू टाय किंवा एविन लुईसची ( Evin Lewis ) जागा घेईल. सध्या तो टायऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता जास्त आहे. दोन्ही संघांची गोलंदाजी चिंतेचे कारण ठरली असली, तरी गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली ( Gautam Gambhir ) सुपर जायंट्स संघाने छाप पाडली आहे.
जेसन होल्डरच्या समावेशामुळे लखनौचा संघ अधिक मजबूत झाला असून पृथ्वी शॉसह वॉर्नर आक्रमक सुरुवात करून देईल, अशी आशा दिल्ली संघाला असेल. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad Against )ळी खेळणाऱ्या लखनऊचा कर्णधार राहुलला क्विंटन डी कॉकने सुपर किंग्जविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी असे वाटते. लखनौच्या गोलंदाजांना मात्र दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवावा लागणार आहे, जो वॉर्नरच्या उपस्थितीमुळे आणखी मजबूत होईल. कर्णधार पंत आणि पृथ्वी यांच्याकडूनही संघाला मोठ्या खेळीची प्रतिक्षा आहे.