महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022: राजस्थान आणि गुजरात संघातील खेळाडूंची यादी, जे आधीच आयपीएल विजेत्या संघांचे राहिलेत सदस्य

गुजरात टायटन्स सातत्याने गुणतालिकेत पहिल्या 2 स्थानांवर आपले वर्चस्व कायम राखले. तसेच राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूकडे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यासाठी पुरेसे मॅच-विनर्स होते. तरी देखील त्यांनी गुजराच टायटन्सने नमवत जेतेपद ( Gujarat Titans First Time Champion ) पटकावले.

IPL 2022
IPL 2022

By

Published : May 30, 2022, 7:05 PM IST

हैदराबाद : गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) चे पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याची स्वप्न रविवारी सत्यात उतरले आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals ) 7 विकेट्सने पराभव करत पहिल्यांदाच आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.

गुजरात टायटन्स सातत्याने गुणतालिकेत पहिल्या 2 स्थानांवर आपले वर्चस्व कायम राखले. तसेच राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूकडे कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्यासाठी पुरेसे मॅच-विनर्स होते. तरी देखील त्यांनी गुजराच टायटन्सने नमवत जेतेपद ( Gujarat Titans First Time Champion ) पटकावले.

From left to right: Ravichandran Ashwin, Wriddhiman Saha, Trent Boult

हा विजय हार्दिक पांड्याचा या फ्रँचायझीसह पाचवा आयपीएल विजय होता. कर्णधार म्हणून त्याने प्रथमच विजेतेपद पटकावल्याने हा मोसम खास होता. जीटीच्या विजयापूर्वी हार्दिक पांड्या चार वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians Team ) संघाचा भाग होता.

ही राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स मधील खेळाडूंची यादी आहे, जे आधीपासून आयपीएल विजेत्या संघांचा ( Already part of IPL winning squads ) भाग आहेत.

खेळाडू संघ वर्ष
हार्दिक पांड्या (सध्या गुजरात टायटन्स) मुंबई इंडियन्स (MI) 2015, 2017, 2019, 2020
ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स) सनरायझर्स हैदराबाद (SRH), मुंबई इंडियन्स (MI) 2016, 2020
रविचंद्रन अश्विन (राजस्थान रॉयल्स) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 2010, 2011
युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) मुंबई इंडियन्स (MI) 2013
जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) मुंबई इंडियन्स (MI) 2017
अल्झारी शाहीम जोसेफ (गुजरात टायटन्स) मुंबई इंडियन्स (MI) 2019
ऋद्धिमान साहा (गुजरात टायटन्स) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 2011

हेही वाचा -Ipl 2022 Big Jersey: आयपीएल 2022 समारोप सोहळ्यात लॉन्च केली सर्वात मोठी आयपीएल जर्सी

ABOUT THE AUTHOR

...view details