हैदराबाद:मंगळवारी आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मधील तेरावा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरुने राजस्थानवर चार विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांनी आपला दुसरा विजय नोंदवताना राजस्थानच्या विजयी रथाला ब्रेक लावला. तसेच या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
दरम्यान त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सचा संघ एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर आला आहे. जास्तीत जास्त संघांनी तीन सामने खेळले आहेत आणि आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर, पहिल्या ते सहाव्या स्थानापर्यंतच्या सर्व 6 संघांचे 4 गुण आहेत.
राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम - राजस्थानचा संघ ( Rajasthan Royals ) (1.218) चांगल्या धावगतीच्या आधारावर पराभव पत्करूनही अव्वल स्थानावर आहे. श्रेयस अय्यरचा कोलकाता नाईट रायडर्स (0.843) राजस्थाननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरनंतर, आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने (0.495) तिसरे स्थान पटकावले आहे. पंजाब किंग्ज (0.238) चौथ्या स्थानावर आहेत, त्यानंतर आणखी एक नवीन संघ लखनौ सुपर जायंट्स (0.193) आणि आरसीबी (0.159) सहाव्या स्थानावर आहेत. दिल्ली (0.065) 2 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे.