नवी मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 66 वा सामना बुधवारी डॉ. डी.व्हाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants ) संघात संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. या दोन संघातील हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता संघाला पराभवा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर आजचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.
लखनौ सुपरजायंट्स संघाने ( Lucknow Super Giants Team ) आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, त्यामुळे या संघाचे 16 गुण असून संघ गुणतालिकेत तिसरऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर कोलकाता संघाने ( Kolkata Knight Riders ) देखील 13 पैकी 6 सामन्यात 12 गुण प्राप्त केले आहेत. त्यामुळे हा संघ सहाव्या स्थानी आहे.
लखनौने त्यांचे शेवटचे दोन सामने गमावले आहेत आणि संघ अद्याप प्लेऑफमध्ये पोहोचू शकलेला नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजी हा संघासाठी अडचणीचा भाग ठरला आहे. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक लवकर बाद झाल्याने संपूर्ण बॅटिंग ऑर्डर खराब झाली. तथापि, शेवटच्या साखळी सामन्यात, संघ आपला सर्वोत्तम खेळ देऊ इच्छितो जेणेकरुन त्यांना प्लेऑफपूर्वी लयीत जाता येईल. दीपक हुड्डा चांगली फलंदाजी करत आहे, पण युवा आयुष बडोनीने गेल्या काही सामन्यांमध्ये निराशा केली आहे. गोलंदाजीत संघाकडे अनेक पर्याय आहेत आणि गरज असताना सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे.