मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या 31 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने लखनौचा सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव करत जिंकला. या पराभवानंतर लखनौचा सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. सुपर जायंट्स संघाचे मार्कस स्टॉइनिस ( Marcus Stoinis ) आणि कर्णधार केएल राहुलवर ( Captain KL Rahul ) आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ( IPL code of conduct ) कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा ( Lucknow Super Giants ) कर्णधार केएल राहुलला आचारसंहिता भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. केएल राहुलने लेव्हल 1 च्या गुन्ह्यात आपली चूक मान्य केली आणि शिक्षा स्वीकारली आहे. त्याचवेळी मार्कस स्टॉइनिसने जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर अंपायरवर आपला राग दाखवला आणि याच कारणामुळे त्याला इशाराही देण्यात आला आहे. तथापि, मार्कस स्टॉइनिस नशीबवान होता की, त्याच्याविरुद्ध कोणताही दंड आकारला गेला नाही. भविष्यात त्यांनी अशी चूक पुन्हा केल्यास त्याला दंडही होऊ शकतो.