पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील चौदावा सामना बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) संघात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने मुंबईवर पाच विकेट्सने विजय मिळवला. यानंतर बीसीसीआयने मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहवर ( Jaspreet Bumrah ) आणि केकेआरच्या नितेश राणावर ( Nitesh Rana ) मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दोघांना आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन ( Violation of IPL Code of Conduct ) केल्याबद्दल फटकारून दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाला पुण्यातील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या संघाच्या सामन्यादरम्यान टाटा इंडियन प्रीमियर लीग ( Tata Indian Premier League ) च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. तसेच त्याच्या मॅच फीपैकी 10 टक्के दंड ( Penalty of 10% of match fee ) आकारण्यात आला आहे.