मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ( IPL 2022 ) एकोणीसावा सामना रविवारी ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे होत आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Kolkata Knight Riders vs Delhi Capitals ) संघात खेळला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. कोलकाता संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Kolkata Knight Riders opt to bowl ) घेतला आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होणार असून कोलकात्याचा पाचवा तर दिल्ली संघाचा चौथा सामना आहे.
कोलकाता संघाने ( Kolkata Knight Riders ) आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन सामने जिंकले असून एक गमावला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तसेच दिल्ली संघाने ( Delhi Capitals ) तीन सामने खेळले आहेत, ज्यापैकी त्यांना फक्त पहिला सामना जिंकता आला. त्यानंतर झालेल्या दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने आज ऑनरिज नॉर्टजेच्या जागी खलील अहमदला संधी दिली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आकडेवारी आणि रेकॉर्ड हेड टू हेड -
- दोन्ही संघ आयपीएलमध्ये एकूण 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यादरम्यान दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत, तर केकेआरने 16सामने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला.
- गेल्या मोसमात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले. यादरम्यान केकेआरने दोनदा, तर डीसीने एक सामना जिंकला.
- केकेआरसाठी दिल्लीविरुद्ध नितेश राणाच्या नावावर 282 धावांची नोंद आहे.
- केकेआर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये पृथ्वी शॉने सर्वाधिक 341 धावा केल्या आहेत.
- सुनील नरेनच्या नावावर आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध केकेआरकडून सर्वाधिक 19 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे.
हवामान आणि खेळपट्टीचा रिपोर्ट -