मुंबई -इंडियन प्रिमीयर लीगमधील 35 ( IPL 2022 ) वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात ( KKR Vs GT ) होणार आहे. आजचा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा संघाशी जोडला आहे. गुजरातने नाणफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Hardik Pandya Win Toss Elects To Bats ) आहे.
या हंगामात गुजरात संघ तडाकेबाज खेळ दाखवत पहिल्या स्थानावर आहे. गुजरातने 6 पैकी 5 सामने जिंकत पहिला स्थानावर झेप घेतली आहे. तर, दुसरीकडे कोलकाता संघाने 7 मधील 4 सामन्यात पराभवाला सामोरे 3 जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात गुजरात आपली गाडी सुसाट सुरु ठेवेल की, कोलकाता पुनरागमन करेल हे पहावे लागणार आहे.