हैदराबाद:आयपीएल 2022 मधील 23 व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 12 धावांच्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर जॉन्टी ऱ्होड्स आणि सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत ( Jonty and Sachin Viral Video ) आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या हृदयाला भिडला. वास्तविक सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा देत होते.
दरम्यान, पंजाब किंग्जचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्स ( Jonty Rhodes ) मुंबईचा मार्गदर्शक सचिनला भेटायला येताच त्याने अचानक भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar ) पायाला स्पर्श करायला सुरुवात केली. सचिनने त्याला तसे करण्यापासून रोखले आणि नंतर जॉन्टी रोड्सला मिठी मारली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे दृश्य पाहून संपूर्ण स्टेडियमधील लोक केवळ हसलेच नाही तर त्यांनी टाळ्यांचा कडकडाटही केला.
बुधवारी संध्याकाळी मुंबई विरुद्ध पंजाब ( Mumbai vs Punjab ) सामन्यात पंजाबने मोठे लक्ष्य ठेवले होते. कर्णधार मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे पंजाबने 198 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ केवळ 186 धावांवरच गारद झाला. अशाप्रकारे मुंबईला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. त्यावेळी पंजाबचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्स यांनी असे काही केले की, स्टेडियममध्ये उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षक हसू रोखू शकले नाहीत.
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॉन्टी ऱ्होड्स 52 वर्षांचा आहे, तर सचिन तेंडुलकर 48 वर्षांचा आहे. आपली संस्कृती अशी आहे की, मोठा कधीही लहानाच्या पाया पडच नाही, पण क्रिकेटच्या धर्मात सचिन हा सर्वात मोठा आहे आणि त्याला क्रिकेटचा देवही म्हटले जाते. मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये जॉन्टी रोड्सचा बराच काळ सहभाग होता. तो संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. 2017 मध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडली. जॉन्टी ऱ्होड्स सध्या पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे, तर तेंडुलकर मुंबई संघाचा मार्गदर्शक आहे.
हेही वाचा -IPL 2022 KKR vs SRH : कोलकाता नाईट रायडर्स समोर आज सनरायझर्स हैदराबादचे आव्हान; कोलकाता विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक