पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 29 वा सामना रविवारी गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Gujarat Titans vs Chennai Super Kings ) यांच्यात पार पडणार आहे. या सामन्याला पुणे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खान यांच्यात नाणेफेक पार पडली. राशिद खानने ( Rashid Khan ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात टायटन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे राशिद खान नेतृत्व करत आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना पहिल्यांदाच खेळला जात आहे. कारण गुजरात टायटन्स संघाने यंदाच आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले आहे. दोन्ही संघाच्या यंदाच्या हंगामातील आतापर्यंत कामगिरी पाहिली, तर दोन्ही संघात खुप फरक आहे. दोन्ही संघानी देखील यंदाच्या हंगामातील प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाने ( Chennai Super Kings Team ) आपल्या पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत दोन गुणांसह 9 व्या स्थानी विराजमान आहे. गुजरात टायटन्सबद्दल ( Gujarat Titans ) बोलायचे, तर या संघाने आतपर्यंत पाचपैकी फक्त एक सामना गमावला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.