मुंबई:इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 40 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी मुंबईतील वानखेडेवर संध्याकाळी साडेसातला सुरु होणार आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले आहे. त्याचबरोबर मागील सामन्यात हैदराबाद संघाने गुजरातचा पराभव केला होता. त्यामुळे या दोन संघात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते.
हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लीगमधील एकमेव पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे हा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, पहिल्या दोन सामन्यांत पराभवाची चव चाखल्यानंतर, सलग पाच सामने जिंकणाऱ्या हैदराबादला गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यासाठी आपली प्रभावी गती कायम ठेवावी लागेल. या संघाने सात सामन्यात दोन पराभव आणि पाच विजयासह गुणतालिकेत 10 गुणांची नोंद करुन दुसरे स्थान पटकावले आहे. या दोन संघांच्या वेगवान गोलंदाजांमध्ये जोरदार लढत होणार आहे. हैदराबादचा युवा भारतीय गोलंदाज उमरान मलिक गुजरातच्या लॉकी फर्ग्युसनच्या 150 किमी प्रतितासच्या वेगाला जवळपास त्याच वेगाने उत्तर देईल.
या बाबतीत मात्र हैदराबादचे पारडे जड दिसत आहे. ज्याने त्यांच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अवघ्या 68 धावांत गुंडाळला होता. संघाचे चार वेगवान गोलंदाज उत्तम लयीत आहेत आणि सर्वजण एकमेकांपेक्षा वेगळ्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. दक्षिण आफ्रिकेचा युवा मार्को यानसेन (पाच सामन्यात 6 बळी) चेंडूला उसळी घेऊन स्विंग करण्याची क्षमता आहे. त्याच वेळी उमरान ( Fast bowler Umran Malik ) (सात सामन्यात 10 बळी) वेगवान आहे. यॉर्कर स्पेशालिस्ट टी नटराजन (सात सामन्यात १५ विकेट) आणि अनुभवी भुवनेश्वर कुमार (सात सामन्यात नऊ विकेट) हे देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.