कोलकाता:इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मंगळवारी (24मे) आयपीएल 2022 मधील पहिला सामना ( First qualifier match ) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) यांच्यात खेळला जात आहे. ईडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने 6 बाद 188 धावा केल्या आहेत. त्याचबोरबर गुजरात टायटन्स संघाला 189 धावांचे लक्ष्य दिले आहे.
जोस बटलर (89) आणि कर्णधार संजू सॅमसन ( Captain Sanju Samson ) (47) यांच्या शानदार फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने (आरआर) इडन गार्डन्सवर खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 189धावांचे लक्ष्य ठेवले. मंगळवारी. गुजरात कडून यश दयाल, रवी श्रीनिवासन साई किशोर, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना, राजस्थान रॉयल्सने पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावत 55 धावांची भर घातल्याने चांगली सुरुवात झाली. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जैस्वाल (3) बाद केले. यानंतर कर्णधार संजू सॅमसनने जोस बटलरसह जोरदार फलंदाजी करत अनेक मोठे फटके मारले. पॉवरप्लेनंतर, दोन्ही फलंदाजांवर गुजरातचे फिरकीपटू राशिद खान आणि साई किशोर यांनी दबाव आणला आणि त्यांचा धावगती कमी केली. ज्यामुळे कर्णधार सॅमसन (47) धावा काढण्याच्या नादात साई किशोरच्या चेंडूवर झेलबाद झाला. यासह त्याच्या आणि बटलरमधील 47 चेंडूत 68 धावांची भागीदारी संपुष्टात आली.