मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला ( Fifteenth season of IPL ) सुरुवात केकेआर विरुद्ध सीएसके ( KKR vs CSK ) यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना शनिवारी (26 मार्च) वानखेडे स्टेडियमवर मुंबई येथे होणार आहे. यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन संघाचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी गुजरात टायटन्स संघाने शुक्रवारी 'आवा दे' ( 'Come on' song ) नावाचे एंथम साँग लाँच केले आहे.
गुजरात टायटन्सने ( Gujarat Titans team ) आयपीएल मैदानावर उतरण्यापूर्वी त्यांच्या संघाचे 'आवा दे' एंथम साँग लाँच केले आहे. फ्रँचायझीने यूट्यूबवर शेअर करून त्याचे थीम साँग लाँच केले आहे. गाण्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या ( Captain Hardik Pandya ), सलामीवीर शुभमन गिल आणि अष्टपैलू राहुल तेवातिया यांचा समावेश आहे. हे गाणे डब शर्मा यांनी लिहिले असून गुजरातचे लोककलाकार आदित्य गढवी यांनी गायले आहे. हे गाणे गुजराती संस्कृतीचे घटक आणि संघाची महत्त्वाकांक्षा एकत्र करत असल्याचे दिसते.
गाण्याच्या सुरुवातीला स्व. श्री कवी नर्मद जय जय गरवी यांच्या सुप्रसिद्ध ओळी गुजरातमधील आहेत. यानंतर 'आवा दे' म्हणजे संघाला खेळण्याचे आव्हान देणे आणि आपण सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे सांगणे. हे गाणे आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शेअर करताना, गुजरात फ्रेंचायझीने ( Gujarat franchise ) कॅप्शनमध्ये लिहिले, "चलो, सब कहते है - आव दे, आव दे! #TitansFAM या एंथमचे अनुसरण करणे आवश्यक आहे!